

सातारा : खंडाळा येथील मोनाली लॉजवर वेश्या व्यवसाय करण्यासाठी महिलांना जबरदस्तीने ठेवल्याप्रकरणाचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 6 महिलांची सुटका केली.
राहुल वसंता श्रुंगारे (रा. स्टारसिटी शिरवळ, ता. खंडाळा), रावेश शेट्टी, मोहम्मद जावेद अख्तर, दत्ता राजू देवकर, हरिष वासुदेव शेट्टी, शुभम आप्पासो घुले, रंजनकुमार लक्ष्मण मल्लिक (सर्व रा. मोनाली लॉज, पारगाव-खंडाळा) अशी आरोपींची नावे आहेत. सर्व संशयित चालक, मालक व कामगार आहेत.
दि. 13 ऑगस्ट पोलिसांना अशी माहिती मिळाली की, खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा गावचे हद्दीत महामार्गावरील मोनाली लॉजचे चालक-मालकांनी वेश्यागमनाकरता मुली, महिला ठेवल्या आहेत. मागणी होईल त्याप्रमाणे ग्राहकांना मुली पुरवल्या जातात. या माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथक, तसेच खंडाळा पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. या पोलिसांनी छापा टाकला असता तेथे वेश्यागमनाचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले
संशयित पीडित महिलांना ग्राहकांसाठी वेश्यागमनासाठी उद्युक्त करत होते. या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याठिकाणी असलेल्या 6 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. सपोनि म्हस्के, फौजदार श्वेता पाटील, पोलिस रामचंद्र गुरव, शरद बेबले, प्रविण फडतरे, रविराज वर्णेकर, मोना निकम, आदिका वीर, अनुराधा सणस, तृप्ती शिंदे, शहनाज शेख या पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.