

खंडाळा : खंडाळा शहरानजीक मंगळवारी रात्री दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून अपघात झाला.
निलेश सतिश ढमाळ ( वय 35, रा. असवली, ता. खंडाळा ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. खंडाळा - शिवाजीनगर रस्त्यावर येथील छत्रपती शिवाजी चौकापासून 200 ते 300 मीटर अंतरावर असणाऱ्या एका शाळेजवळ हा अपघात झाला. दोन्ही बाजूंकडून भरधाव वेगात दुचाकी आल्याने हा अपघात झाला. या घटनेची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली आहे.