Khambatki Ghat traffic: खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने वाहतूक धिम्या गतीने

खंबाटकी येथे रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दत्त मंदिराजवळ मालवाहू ट्रक बंद पडल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला
Khambatki Ghat traffic: खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने वाहतूक धिम्या गतीने
Published on
Updated on

खंडाळा : खंबाटकी येथे रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दत्त मंदिराजवळ मालवाहू ट्रक बंद पडल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे एकेरी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. एकच लेन सुरू असल्याने घाटात वाहनांच्या काही काळ रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच खंडाळा पोलीस व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले . बंद पडलेला मालट्रक रस्त्यातून बाजुला काढून तातडीने वाहतूक सुरळीत केली.

खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळील वळणावर रस्ता अरुंद असून चढाचा असल्याने येथे अवजड वाहने नेहमीच बंद पडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एक लेन बंद होऊन वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवावी लागते. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दत्तमंदीरा जवळ माल ट्रक बंद पडला. त्यामुळे वाहतुकीस अडथळा आल्याने एकेरी वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. एकच लेन सुरु असल्याने घाटात वाहनांच्या काही काळ रांगा लागल्या होत्या.

घाटातील इतर ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण झाले असले तरी दत्त मंदिराजवळ सुमारे 100 मीटरचा भाग अद्याप रुंद करण्यात आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. वाहतूक कोंडी झाल्यानंतर मागे वाहनांची मोठी गर्दी होते. काही वाहनचालक पुढे जाण्याच्या घाईत वाहन काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहने एकमेकांना घासणे, वाहने बंद पडणे तसेच चालकांमध्ये वादावादी होण्याचे प्रकार घडतात. स्थानिक तरुण, वाहन दुरुस्ती करणारे युवक तसेच मदतीसाठी धावणारे क्रेनचालक यांच्या सहकार्याने घाटातील वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली जाते.

खांबाटकी घाटातील वाहतूक कोंडीत अनेकदा रुग्णवाहिकादेखील अडकून पडतात. त्यामुळे वृद्ध, महिला व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक अधिकारी, राजकीय व्यक्ती तसेच मंत्री यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच बंद पडलेली वाहने तातडीने बाजूला करण्यासाठी दत्त मंदिराजवळ कायमस्वरूपी क्रेन उपलब्ध करून देण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news