

कराड : अध्यात्म, मांगल्य, आनंद, समृद्धी आणि उत्सवाचे प्रतीक असणारा नवरात्रौत्सव म्हणजे महिलांसाठी पर्वणीच असते. नवरात्र उत्सव आणि गरबा दांडिया हे भारतीय संस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय सण आहे. या सणाचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे सदस्यांसाठी सोमवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी दु. 2 वाजता उत्सव लॉन, वाखाण रोड, कराड येथे गरबा दांडिया व कोजागिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कस्तुरी क्लब नेहमीच महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करत असते. महिलांना सणासुदीचा मनसोक्त आनंद घेता यावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. गरबा दांडिया या कार्यक्रमाचे प्रायोजक महालक्ष्मी ज्वेलर्स असून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार्या प्रत्येक महिलेस महालक्ष्मी ज्वेलर्स कडून गिफ्ट कूपन देण्यात येणार आहे.
कार्यक्रम फक्त कस्तुरी सभासदांसाठी आहे. कार्यक्रमात बेस्ट ड्रेपरी, बेस्ट जोडी, बेस्ट परफॉर्मन्स अशी स्पर्धा असून यासाठी आकर्षक सहा बक्षिसे देण्यात येणार आहेत. गिफ्ट प्रायोजक महालक्ष्मी ज्वेलर्स व शमाज् ब्युटीपार्लर, कराड हे आहेत. परीक्षक म्हणून पीएसएन डान्स अॅकॅडमी (वाखाण रोड) आहेत. कार्यक्रमस्थळी भरपूर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त सदस्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी स्वप्नाली पाटील, मो. 9422030484
कार्यक्रमास येणार्या महिलांनी घागरा किंवा गुजराती साडी परिधान करून येणे.