Flower Market: लग्नसराईमुळे फुलबाजाराला ‌‘बहर‌’

मोगरा हजाराच्या उंबरठ्यावर; गुलाब,जरबेरी,निशिगंधालाही मोठी मागणी
Flower Market: लग्नसराईमुळे फुलबाजाराला ‌‘बहर‌’
Published on
Updated on

कराड : सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळे कराड शहरासह परिसरातील फुलबाजारात मोठी तेजी निर्माण झाली आहे.विवाह सोहळे, साखरपुडा, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक आयोजनांमुळे गुलाब, मोगरा, जरबेरी आणि निशिगंध या फुलांची मागणी वाढली असून दरातही मोठी वाढ झाली आहे.

फुल व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुलाबाचे दर प्रतिकिलो 120 ते 180 रुपये दरम्यान आहेत. मोगऱ्याला सर्वाधिक मागणी असून त्याचे दर 700 ते 950 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. जरबेरी फुलांचा वापर सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचे दर प्रती नग 4 ते 12 रुपये इतके आहेत. निशिगंधाच्या दरातही वाढ झाली असून प्रतिकिलो 200 ते 350 रुपये किंवा प्रती जुडी 80 ते 150 रुपये दराने विक्री होत आहे.

उन्हाच्या तीव्रतेमुळे फुलांचे उत्पादन घटले असून दुसरीकडे लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कराडमध्ये पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. विशेषतः विकेंड आणि शुभमुहूर्ताच्या दिवशी मागणी अधिक वाढत असल्याने दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फुलांच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली असली तरी लग्नसमारंभातील सजावट आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. कराडमध्ये सध्या लग्नसराईमुळे फुलांच्या बाजारात मोठी तेजी दिसत आहे. विशेषतः गुलाब,मोगरा,जरबेरी आणि निशिगंध या फुलांना मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news