Karad theft case: सैदापूर, आगाशिवनगर येथे घरफोडी

सैदापूर व आगाशिवनगर येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला
theft case
theft casePudhari Photo
Published on
Updated on

कराड : सैदापूर व आगाशिवनगर येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सैदापूर येथील संजय नांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. 3 एप्रिल रोजी नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असल्याने ते कुटुंबासमवेत पुणे येथे गेले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी दहा वाजता घरी आल्यानंतर घराचे मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. तेव्हा त्यांनी घरामध्ये जाऊन पाहिले असता बेडरूममधील लाकडी कपाटातील ड्रॉव्हरमध्ये असेलेले सुमारे साडेपाच लाख रुपयाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत त्यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. आगाशिवनगर येथील पूजा तेजस ढेब यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलाला गोटे येथे आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी मुलगा व पतीसोबत गेल्या होत्या. पूजा यांना गोटे येथे सोडल्यानंतर त्यांचे पती कामावर निघून गेले. त्यानंतर त्या दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरी गेल्या असता त्यांना घराचे मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. तेव्हा त्यानी घरामध्ये जाऊन पाहिले असता बेडरूममधील लोखंडी कपाटातील ड्रॉव्हर उघडलेला दिसला. त्यामध्ये असलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news