Karad Lodge raid: वारणा लॉजवर कराड पोलिसांचा छापा; दोन महिलांची सुटका

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Karad Lodge raid: वारणा लॉजवर कराड पोलिसांचा छापा; दोन महिलांची सुटका
Pudhari
Published on
Updated on

कराड : कराड शहर पोलिसांनी आर्थिक फायद्यासाठी सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर धडक कारवाई करत कराड येथील वारणा लॉजवर छापा टाकून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 21 मे रोजी रात्री वारणा लॉज येथे बनावट ग्राहक पाठवून छापा टाकण्यात आला. यामध्ये बिलाल पठाण (वय 35, रा. मंगळवार पेठ, कराड), हर्षवर्धन माणिक कांबळे (वय 20), ओंकार सुनील कांबळे (वय 25, दोघे रा. सुकलवाड, ता. वाळवा, जि. सांगली), तसेच प्रमोद सापटे व मनोज कांबळे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक लीना कडूसकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news