karad News: 'आम्ही भाई आहोत', म्हणणाऱ्यांचा खेळखल्लास, कराड पोलिसांकडून मुंबईतून सात जणांना अटक

दहशत माजविणार्‍या सात जणांच्या आवळल्या मुसक्या, मंगळवारी रात्री दोघांवर कोयत्याने सशस्त्र हल्ला करुन झाले होते फरार
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

कराड : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात बसस्थानक परिसरात आम्ही भाई आहोत असे म्हणत मंगळवारी रात्री दोघांवर कोयत्याने सशस्त्र हल्ला करणार्‍या सात जणांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यात कराडमधील इरफान आसिफ पठाण आणि दर्शन शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

हल्ला केल्यानंतर सातही संशयित मुंबईत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे. साद अश्पाक मुलाणी (आझाद चौक, कराड), हुजेफा शब्बीर शेख (गुरूवार पेठ, कराड), सद्दाम गौसपाक शेख (कार्वे नाका, कराड), शोएब मोमीन (रैनाक गल्ली, कराड), फरहान शेख (मुजावर कॉलनी, कराड), अकरम मुल्ला (पाली, ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत.

त्यांना शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता 13 एप्रिलपर्यत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी दिला असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news