LPG cylinder issue: गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच- लांब रांगा

कराड तालुक्यात गॅस सिलिंडरची टंचाई ; हॉटेल व्यवसायांवर परिणाम
LPG cylinder issue
LPG cylinder issue: गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच- लांब रांगा Pudhari
Published on
Updated on

रेठरे बुद्रुक : आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका -इस्त्राईल तसेच इराणमध्ये युद्ध सुरू झाल्याने आखाती देशांमधून येणारा एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी होवू लागला आहे. त्याचा परिणाम व्यावसायिक व घरगुती गॅस सिलिंडरवर होऊ लागला आहे. रेठरे येथे अष्टविनायक भारत गॅस वितरणच्या कार्यालयाबाहेर सकाळ पासून गॅस सिलिंडरची टाकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशीच परिस्थिती बहुतेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पहायला मिळत आहे.

रेठरे बुद्रुक परिसरात रोटेशन प्रमाणे गॅस सिलिंडरची विक्री होत आहे. परंतु युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने येणाऱ्या काळात गॅस सिलिंडर मिळणे अवघड होईल याची भीती ग्राहकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे घरातील रिकामी गॅस टाकी घेऊन ग्राहकांनी गॅस कार्यालयात धाव घेतली आहे.

वास्तविक गेल्या चार-पाच दिवसापासून गॅस टंचाई निर्माण झाली आहे. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस मिळणे खूप कठीण होणार असल्याची चर्चा होवू लागल्याने गॅस सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू झाली आहे. सुरळीत वितरण सुरू असताना अचानक ग्राहक गॅस वितरणच्या कार्यालयासमोर आल्याने एकच झुंबड उडाली. गॅस सिलिंडरची टाकी घेण्यासाठी लांबच -लांब रांगा लागल्या होत्या. एका ट्रक मधून आलेल्या गॅस सिलिंडरच्या टाक्या काही वेळातच संपल्या. त्यामुळे गर्दी अधिकच वाढली.

हॉटेल व्यावसायिकापेक्षा घरगुती गॅस सिलिंडर मिळावा यासाठी ग्राहकांची मागणी अधिक होती. दरम्यान व्यावसायिक वापरासाठी गॅस टाकी मिळणे अवघड झाल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. खाद्य पदार्थांचे हातगाडे बंद ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news