Karad job fraud: नोकरीच्या आमिषाने गंडा घालणारा भामटा गजाआड

कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची राजस्थानमध्ये कारवाई
Job Scam
Job ScamPudhari
Published on
Updated on

कराड : कराड शहर व परिसरात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकजणांना गंडा घालणाऱ्या भामट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने राजस्थान येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडे कसून तपास सुरू असून काही प्रमाणात मुद्देमालही हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पंकज बाबुलाल शर्मा (वय 35 रा. मूळ जशनगर ता. मेरठासिटी, जि. नागोर, राजस्थान) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. कराड शहर व परिसरात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी काही घटना कराड शहर पोलिस ठाण्यात नोंद झाल्या आहेत. त्या अनुषंगाने डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी या भामट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम हे मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन दिवसापूर्वी आपल्या टीमसोबत राजस्थानला रवाना झाले होते. तेथे जाऊन त्यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताची माहिती गोळा करून तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याला कराड येथे आणून कसून चौकशी केली असता त्यांने कराडसह परिसरातील अनेकजणांना नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. पंकज शर्मा हा मूळचा राजस्थानचा असून तो महाराष्ट्रात इचलकरंजी, पुणे आदी भागात वास्तव्यास होता. त्याने कराडसह इतर भागातही अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून काही प्रमाणात मुद्दल हस्तगत केली आहे. पोलिसांनी शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 7 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून यामध्ये आणखी काहीजणांचा समावेश आहे का?, अजून किती जणांना याने गंडा घातला आहे, आदी बाबींचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news