Karad Crime: पिस्टल विक्रीसाठी आलेल्या चौघांना अटक

देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली
Karad Crime: पिस्टल विक्रीसाठी आलेल्या चौघांना अटक
pudhari photo
Published on
Updated on

कराड : देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. शासकीय रत्नागिरी गोदामाच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई झाली.

यामध्ये चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अफताब बादशाह मोमीन (वय २४ ), रोहन मेहबुब शेख (१९, दोघेही रा. रा. मुजावर कॉलनी, कराड), अमर रघुनाथ पाटील (२३, रा. काले, ता. कराड) व ओंकार प्रकाश हिंगणे (२५, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व हवालदार संदीप कुंभार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शासकीय रत्नागिरी गोदामाच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानात चौघेजण विनापरवाना पिस्टल विक्रीकरिता थांबले आहेत. पोलिसांनी तेथे छापा टाकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news