

कराड : दगडाने भरलेल्या भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू झाला. सुषमा आनंदा किर्तने (वय 54, रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड) असे मृत प्राध्यापिकेचे नाव आहे. कराड शहरात विटा मार्गावर जनता बझारनजीक सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
डंपर चालकाला वाचविण्यासाठी घटनास्थळावरून डंपर पोलिस ठाण्यात नेत असताना वाटेत दगड उतरविल्याने जमावाने पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार केला होता आणि यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला.