Karad News|कागदावर पाऊस, मात्र शेतशिवारात दुष्काळ

कराडसाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आक्रमक; मुख्यमंत्र्यांना निवेदन
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
Published on: 
Updated on: 

कराड : पावसाची सरासरी समाधानकारक असल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसत असले, तरी कराड तालुक्यातील शिवारातील परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सरासरीची आकडेवारी वाढली असली, तरी त्यानंतर शेतीसाठी आवश्यक असलेला उपयुक्त पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक भागांत खरीप पिके वाळून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कराड तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात पावसाचे प्रमाण विषम असल्याचे डॉ. भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे. यंदा पूर्व भागात सरासरी एवढा, तर पश्चिम भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात खरीप हंगामात भाताची ३ हजार ८९३ हेक्टर, खरीप ज्वारीची २०७, मक्याची ४८, इतर तृणधान्यांची ४९, इतर कडधान्यांची ४७३, भुईमुगाची १० हजार ७४६ आणि सोयाबीनची १५ हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

पावसाच्या टक्केवारीचा विचार करताना काही दिवस सलग झालेला जोरदार पाऊस सरासरीत गणला गेल्याने तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, जून ते सप्टेंबरदरम्यान ठराविक काही दिवस वगळता शेतीसाठी उपयुक्त पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळाला नसून अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. त्यामुळे कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ द्यावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कराड तालुक्यातील काही गावात पिकांना पर्यायी पाण्याची व्यवस्था नसल्याने आणि उन्हाचा कडाचा वाढल्याने खरीप धोक्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news