Karad Crime : प्रेमसंबंधातूनच काढला लक्ष्मण मंडलेंचा काटा

कार्वेतील प्रियकरासह कराडातील चालक गजाआड
Karad Crime News
कराड : संशयितांसह राजश्री पाटील, दत्तात्रय दराडे व पोलिस पथक.
Published on
Updated on

कराड : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या लक्ष्मण मंडले यांचा कायमचा काटा काढणाऱ्या प्रियकरासह दोघा संशयितांना अटक करण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. मंडले यांचा खून करण्यासाठी संशयितांनी वापरलेली कार जप्त केली असून, दोन्ही संशयितांना १२ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला.

पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील व पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. प्रथमेश प्रकाश थोरात (वय २५, रा. कार्वे, ता. कराड) आणि आकाश अशोक होनसुरे (२३, रा. कल्पतरू कॉलनी, थोरात हॉस्पिटलजवळ, कराड) अशी संशयितांची नावे आहेत. यापूर्वी याप्रकरणी लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना अटक केली आहे.

संशयित आकाश होनसुरे यानेच पैशाच्या आमिषाला बळी पडून मित्र प्रथमेश याच्या सांगण्यावरून लक्ष्मण मंडले यांच्या अंगावर गाडी घातल्याचे समोर आले आहे. संशयित प्रथमेश थोरात याची कापड दुकानामुळे सारिका मंडले हिच्याशी ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अशी माहिती समोर आली आहे. सारिका हिचे मागील तीन वर्षांपासून प्रथमेश याच्यासोबत प्रेमसंबंध होते. लक्ष्मण मंडले हे सारिका हिला त्रास देत होते. त्यामुळेच प्रथमेश थोरात याच्या मदतीने सारिका मंडले हिने पती लक्ष्मण मंडले यांचा काटा काढण्याचा कट रचला होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news