Karad Crime: कराडातील बंटी आणि बबली गजाआड

प्रवाशांना लुटणाऱ्या पती - पत्नीस कराड शहर पोलिसांनी गजाआड केले
Karad Crime: कराडातील बंटी आणि बबली गजाआड
Published on
Updated on

कराड : येथील बसस्‍थानक परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या पती - पत्नीस कराड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. संशयितांकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र हस्‍तगत करण्यात यश आले असून दोन्ही संशयितांकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी दिली आहे.

श्रावण राजेश कांबळे (वय ३३) आणि पुनम श्रावण कांबळे (वय २७, दोघेही रा. बैलबाजार परिसर, कराड) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्या दोघांना शनिवारपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कराड बसस्‍थानक परिसरात २२ जूनला रात्री साडेनऊ वाजण्याच्‍या सुमारास एका महिलेला संशयित महिलेसह दोघांनी लुटले होते.

फिर्यादी महिला ही बसस्‍थानक परिसरातून चालत जात होती. ती एकटी असल्याची संधी साधत अंधाराचा फायदा घेत श्रावण कांबळे आणि पुनम कांबळे या दोघांनी त्या महिलेस अडवित ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच महिलेला ढकलून देत तिच्‍या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत संशयितांनी पोबारा केला होता. संबंधित महिलेने घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी फिर्यादी महिलेने सांगितलेले वर्णन आणि परिसरातील सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संंबंधित वर्णनाच्‍या व्‍यक्ती यावरून संशयितांना कराड शहर परिसरातून ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत सहभाग स्‍पष्ट होताच त्या दोघांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निखिल मगदुम यांच्‍या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news