Karad bus stand: स्वच्छ सुंदर बसस्थानक स्पर्धेत कराड तृतीय

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिसऱ्या फेरीमध्ये कराड आगाराला पुणे विभागात ‌‘अ‌’ वर्ग मध्ये तृतीय क्रमांक मिळाला
Karad bus stand
Karad bus standPudhari
Published on
Updated on

कराड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिसऱ्या फेरीमध्ये कराड आगाराला पुणे विभागात ‌‘अ‌’ वर्ग मध्ये तृतीय क्रमांक मिळाला आहे. गतवर्षी याच स्पर्धेच्या फायनलमध्ये कराड आगाराने द्वितीय क्रमांक पटकावला होता. द्वितीय फेरीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला होता. ऑगस्ट 2025 ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीत तिसरे सर्वेक्षण पूर्ण झाले होते.

खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाचीही वाहतूक स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, अशी सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार एसटी महामंडळाने राज्यातील 580 एसटी बस स्थानक स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता अभियानाची मोहीम हाती घेत हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धा राबवण्यात येते. या अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने कराड बसस्थानकाची पहाणी केली व समाधान व्यक्त केले. या प्रसंगी समितीने कराड बसस्थानकातील स्वच्छता, प्रशासकीय कार्यालय, फलाटाची स्वच्छता तसेच बसस्थानक परिसरातील स्वच्छतेची पाहणी करून विविध रजिस्टर व फाईलची पाडताळणी केली.

समितीने कराड बस स्थानकाची स्वछता पाहून समितीने समाधान व्यक्त केले.बोलक्या भिंती व कराड बस स्थानकात केलेली आकर्षक रंगरंगोटी समितीला आवडली. तसेच सेल्फी पॉईंटचेही समितीने कौतुक केले होते.

यशाचे सर्व श्रेय आगारातील चालक- वाहक, कार्यशाळा कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व पर्यवेक्षक यांचेच आहे. फायनल फेरीत बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- शर्मिष्ठा पोळ आगार व्यवस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news