

कराड : लग्न समारंभासाठी निघालेल्या तांबवे येथील एका महिलेचे सुमारे 11 तोळे सोने कराड बसस्थानक परिसरातून चोरीस गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर संबंधित महिलेने कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
संबंधित महिलेचे नाव रेखा चव्हाण असे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. कराडहून पंढरपूरला लग्नासाठी संबंधित महिला एसटीतून जाण्यासाठी बसस्थानक परिसरात आली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत संशयितांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी बसस्थानक परिसरासह शहरात संशयितांची माहिती घेण्याची सूचना केली होती; मात्र रात्रीपर्यंत संशयितांचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता.