Karad News: सम्राज्ञीची झेप; हायरॉक्स फिनिश करणारी कराडची पहिली महिला

कराड येथील सम्राज्ञी संदीपान पवार हिने बेंगळुरू येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील हायरॉक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शहराचा गौरव वाढवला
Karad News: सम्राज्ञीची झेप; हायरॉक्स फिनिश करणारी कराडची पहिली महिला
Published on
Updated on

कराड : कराड येथील सम्राज्ञी संदीपान पवार हिने बेंगळुरू येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील हायरॉक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शहराचा गौरव वाढवला आहे. कराडमधून ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारी ती पहिली महिला ठरली असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हायरॉक्स ही जागतिक स्तरावर आयोजित केली जाणारी अत्यंत कठीण फिटनेस स्पर्धा असून त्यात धावण्यासोबत विविध स्ट्रेंथ वर्कआउट्सचा समावेश असतो. सम्राज्ञीने ही स्पर्धा 2 तास 25 मिनिटांत पूर्ण करत आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची प्रभावी झलक दाखवली. या स्पर्धेत सहनशक्ती,ताकद आणि सातत्य यांची कठोर परीक्षा होते.

या यशासाठी सम्राज्ञीने अनेक महिने शिस्तबद्ध प्रशिक्षण घेतले.आयटी क्षेत्रातील नोकरी सांभाळत दररोज सराव करत तिने धावणे, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फिटनेस व्यायामांचा समतोल साधला. योग्य आहार आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. तिच्या यशामागे कोच शिव सर यांचे मार्गदर्शन आणि कुटुंबियांचा पाठिंबा मोलाचा ठरला. विशेषतः पती तेजस बोधे यांचे प्रोत्साहन तिच्यासाठी प्रेरणादायी ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news