सातारा : ‘कास’ खुलले; पठार बहरू लागले

दोन हजार पर्यटकांची ऑनलाईन नोंदणी : गुलाबी फुलांची अनोखी नजाकत
Satara Kas Pathar
कास पठारावर गुलाबी फुलांचा नजारा पहायला मिळत असून सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

बामणोली : पुढारी वृत्तसेवा

कास पठाराचा हंगाम सुरू झाल्यानंतर पठारावर पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार अशा सलग सुट्ट्या जोडून आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत. त्यातच पावसाने उघडीप दिल्याने कास पठार व बामणोलीकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. पठार विविध जातीच्या फुलांनी बहरल्याने सर्वत्र गुलाबी गुलाबी वातावरण झाले आहे. गेल्या काही दिवसात हजारो पर्यटकांनी भेट दिली आहे. रविवारसाठी 2 हजार पर्यटकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

Satara Kas Pathar
‘कास’ पठार फुलांनी बहरू लागले!

शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने देश विदेशातील पर्यटकांनी कास पठारावर फुले पाहण्यासाठी गर्दी केली होती. सध्या कास पठारावर तेरडा या तांबड्या फुलांनी पठार फुलले आहे. तसेच सात वर्षातून एकदा फुलणारी टोपली कारवी ही फुले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. याचबरोबर गेंद, धनगरी फेटा,चवर, दीपकांडी, आभाळी, नभाळी, सीतेची आसवे, सोनकी, भारांगी, तुतारी, कुमुदिनी तलावामध्ये कुमुदिनी यासह असंख्य छोट्या-मोठ्या वेगवेगळ्या प्रजातीमधील फुले पूर्णपणे उमलली आहेत. ऐन गणेशोत्सवातच पावसाने उघडीप दिल्याने पठार आणखी विविध फुलांनी बहरत आहेत. रविवार, सोमवार व मंगळवार अशा तीन दिवस परत सलग सुट्ट्या असल्याने कास पुष्प पठारावर पर्यकांची वर्दळ आणखी वाढणार आहे.

Satara Kas Pathar
कास पठारावरती बहरतोय विविध रानफुलांचा रंगोत्सव

हंगाम सुरू झाल्यानंतर 15 हजार पर्यटकांची भेट

दि. 5 सप्टेंबर रोजी कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. सद्यस्थितीत पर्यटकांची संख्या वाढत असून गत 10 दिवसात सुमारे 12 ते 15 हजार पर्यटकांनी पठाराला भेट दिली आहे. कास कार्यकारी समितीने आता ऑनलाईन बुकिंगही सुरू केले आहे. याचा फायदाही पर्यटकांना होत आहे. ऑनलाईनसह स्थानिक पर्यटकही गर्दी करत आहेत. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक आणखी गर्दी करणार असल्याने तसे नियोजन वन विभाग आणि कास समितीकडून करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news