Jawali illegal liquor sale : जावली तालुक्यात बेकायदा दारू विक्री

उत्पादन शुल्क मंत्र्यांना अवैध दारू भेट देण्यावर विलासबाबा जवळ ठाम
Jawali illegal liquor sale |
Jawali illegal liquor sale : जावली तालुक्यात बेकायदा दारू विक्री file
Published on
Updated on

मेढा : जावली तालुक्यातील मेढा, सायगाव, कुडाळ व करहर विभागात बेकायदा दारू विक्री सुरूच आहे. याबाबत झालेल्या कारवाया समाधानकारक नाहीत. त्यामुळे 15 ऑगस्टनंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.अजितदादा पवार यांना अवैध दारू भेट देण्यावर ठाम असल्याचे व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक व दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते विलासबाबा जवळ यांनी सांगितले.

जावली तालुक्यात रणरागिणींनी 17 वर्षापूर्वी संपूर्ण तालुका दारू दुकानमुक्त केला. पण, हप्तेखोरीच्या रोगाची लागण झाल्याने बाजारपेठांच्या गावात दोन-चार अवैध दारू विक्रेते आम्ही 20 ते 35 हजार हप्ता देतो त्यामुळे आमचे कोणीच काही करू शकत नाही, अशा थाटात अवैध धंदे करत आहेत. पानटपर्‍या, चिकन-मटण दुकाने, हॉटेल-ढाबा व बंद कॅबिन यांचा आडोसा घेवून खुलेआम अवैध दारू विक्रीची दुकानेच थाटली आहेत. यासाठीच विलासबाबा जवळ यांनी अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारला आहे. कोणत्याही परिस्थितीत 15 ऑगस्टनंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. अजितदादा पवार यांना अवैध दारू भेट देण्यावर ठाम असल्याचे सांगितले.

जावली तालुक्यातील अवैध दारू विक्री व मटका धंद्याच्या विरोधात यापूर्वीच 4 जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख व उत्पादन शुल्क विभाग यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. तद्नंतर गेल्या महिन्याभरात उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाने काही कारवाया केल्या आहेत. मेढा विभागात याचा परिणाम थोडा दिसत असला तरी सायगाव, कुडाळ व करहर विभागात परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसत आहे. उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत 29 जुलै रोजी बैठक आयोजित केली होती. ही चळवळ राज्याला दिशा देणारी असल्याने आपण कर्तव्य भावनेतून कारवाया करून चळवळीला सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाला दिल्या.

जावलीचे तहसीलदार यांना फोनवरून तालुकास्तरीय अवैध दारूबंदी समिती स्थापन करून तातडीने बैठक घेवून उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यानंतर तहसीलदार यांनी 31 जुलै रोजी तातडीने अवैध दारूबंदी समितीची मीटिंग बोलावून झालेल्या कारवायांबाबत उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाकडून माहिती घेतली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून विलासबाबा यांनी झालेल्या कारवायांबाबत समाधानी नसल्याचे मत नोंदविले.

‘या’ दारू विक्रेत्यांना तडीपार करा

मेढा, सायगाव, कुडाळ व करहर विभागातील प्रमुख अवैध दारू विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई होत नाही. काही कारवाया रेकॉर्ड रंगवण्यापुरत्या होतात. या कारवायांचा धाक नसल्यामुळे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. पोलिस व अवैध धंदेवाले यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप खुलेआम होत आहे. त्यामुळे अवैध धंदे बंद होत नाहीत व संंबंधितांवर तडीपारीची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचे विलासबाबा जवळ यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news