सातार्‍यात मुलाखतकर्त्यांची रंगली मुलाखत

मराठी भाषा पंधरावड्याचा समारोप
Sudhir Gadgil |
नामवंत निवेदक सुधीर गाडगीळ यांचा सत्कार करताना विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते, शेजारी नंदकुमार सावंत, किशोर बेडकीहाळ, चंद्रकांत बेबले, अजित साळुुंखे व इतर.Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : सातार्‍यातील शाहू कलामंदिरमध्ये तब्बल 7200 जणांच्या मुलाखती घेऊन त्यांना बोलते करणारे नामवंत निवेदक सुधीर गाडगीळ यांचीच मुलाखत घेतली गेली. यात त्यांनी विविध मान्यवरांविषयीच्या आठवणींचा पाट उलगडला. दादा कोंडके, बाळासाहेब ठाकरे, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम व अन्य मंडळींचे किस्से सांगत सातारकरांपुढे आठवणींचा पेटारा खुला केला.

सातारा नगरपालिका व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या वतीने आयोजित मराठी भाषा पंधरावड्याचा समारोप नामवंत निवेदक सुधीर गाडगीळ यांची मुलाखत आणि त्यांचा पंच्याहत्तरीच्या निमित्तच्या सत्काराने झाला. त्यांची मुलाखतकार स्नेहल दामले व घनश्याम पाटील यांनी घेतली. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, मसाप, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, किशोर बेडकीहाळ, कार्याध्यक्ष चंद्रकांत बेबले, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत उपस्थित होते.

यावेळी सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत क्षेत्रातील त्यांचा झालेला प्रवेश, आलेले अनुभव, यासाठी लागणारी चिकाटी, मेहनत याविषयी सांगितले. मुलाखतीपूर्व संबंधित व्यक्तीचा मित्रपरिवार, शेजारी यांच्याबरोबर चर्चा करून त्या व्यक्तीचा अभ्यास, त्यांच्या आवडीनिवडी सामाजिक प्रतिष्ठेची जाणीव, हजरजबाबीपणाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी मराठी भाषा पंधरावडा गेले 14 वर्षे अखंडपणे सुरू आहे. यात सातारा नगरपालिकेचे मोठे योगदान आहे. सातारा नगरपालिका देशातील एकमेव नगरपालिका आहे जी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करते. यावर्षी घेतलेल्या अभिवाचन आणि काव्यवाचन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. सातार्‍यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, अशी मागणी आम्ही केली असून याबाबत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही पत्र दिले असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. संदीप श्रोत्री, डॉ.राजेंद्र माने, वजीर नदाफ, आर. डी. पाटील, डॉ. उमेश करंबेळकर, अमर बेंद्रे, सौ.ज्योती कुलकर्णी, सौ.अश्विनी जठार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news