Satara infant death case: राज्याच्या ॲडव्होकेट जनरलला हजर राहण्याचे आदेश

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील मृत अर्भकप्रकरणी कोल्हापूर सर्किट बेंचने आरोग्य विभागाने एफआयआरची गरज नसल्याचे म्हटल्याने नाराजी व्यक्त केली
infant death case
infant death casePudhari
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील मृत अर्भकप्रकरणी कोल्हापूर सर्किट बेंचने आरोग्य विभागाने एफआयआरची गरज नसल्याचे म्हटल्याने नाराजी व्यक्त केली. यामुळे पुढील तारखेला राज्याच्या ॲडव्होकेट जनरल यांनी न्यायालयात हजर राहावे, असे आदेश सर्किट बेंचने दिले आहेत.

कर्नाटक राज्यातील मुलीची सातारा सिव्हिलमध्ये प्रसुती झाल्यानंतर अर्भकाचा काही तासातच मृत्यू झाला. याप्रकरणी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये मुलीच्या कुटुंबीयांनी न्यायालयात दाद मागितली. या घटनेतूनच जिल्हा शल्यचिकित्सक व स्त्री रोगतज्ज्ञ या दोघांचे निलंबन झाले. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकेवर सुनावणी सुरू असताना मुलीच्या आरोग्यासह तिला मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशनसाठी दिला जावा, असे आदेश दिले. तसेच तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यासाठी एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले.

साताऱ्यातील अर्भक मृत्यूप्रकरणी न्यायालयाच्या या भूमिकेनंतर पुढे काय होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दरम्यानच्या काळात राज्याच्या आरोग्य विभागाने न्यायालयात म्हणणे सादर केले. त्यामध्ये एफआयआर दाखल करण्याची गरज नसल्याचे म्हटले. यामुळे पुढील 16 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी राज्याच्या ॲडव्होकेट जनरल यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये हजर राहावे, असे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news