

सातारा : सातारा पालिका निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले सागर पावसे यांनी पुण्यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विकासावर चर्चा झाली.
यावेळी पावसे यांनी उदयनराजे गटात सहभागी होत पाठिंबा जाहीर केला. यावेळी सुनील काटकर, काका धुमाळ, माजी उपनराध्यक्ष रवींद्र पवार, विश्रांत कदम, राजेंद्र शेडगे,आर. वाय. जाधव, अंकुश जाधव, माजी नगरसेवक कल्याण राक्षे आदी नागरिक उपस्थित होते.