

सातारा : सातारा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सालपे ता. फलटण येथे हॉटेल मधुसागरमध्ये बेकायदशीर गोवा बनावटीच्या विदेशी मद्यावर महाराष्ट्र राज्यातील बनावट लेबल चिटकावून विक्री करणाऱ्या ठिकाणावरुन आरोपींना ताब्यात घेवून कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 5 लाख 61 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाच्या निरीक्षकांनी केली. या कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, विजय मरोड, पांडुरंग कुंभार, सागर आवळे, अजित रसाळ, राणी काळोखे, आबासाहेब जानकर, अरुण जाधव, बाळासो पांचुदे यांनी भाग घेतला होता. या गुन्ह्याचा तपास भरारी पथकाचे निरीक्षक माधव चव्हाण हे करत आहेत.
जिल्ह्यामध्ये कोणत्याही बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक होत असल्यास त्याची माहिती तत्काळ राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास देण्यात यावी, असे आवाहन अधीक्षक भुतकर यांनी केले आहे.