ऐतिहासिक वाघनखं शुक्रवारी सातार्‍यात

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती : प्रशासन सज्ज
Historical tiger fight in Satara on Friday
ऐतिहासिक वाघनखं शुक्रवारी सातार्‍यातPudhari File Photo

सातारा : पुढारी वृत्तसेवा

ऐतिहासिक वाघनखांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. शुक्रवार दि. 19 जुलै रोजी ऐतिहासिक वाघनखांचे सातार्‍यात आगमन होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचा फौजफाटा उपस्थित राहणार आहे. संग्रहालयाच्या उद्घाटनानंतर जि. प. च्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये पुढील कार्यक्रम पार पडणार आहे.

लंडनच्या व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील वाघनखं राज्य सरकार भारतात आणत आहे. यासाठी ब्रिटन सरकार आणि राज्य सरकार यांच्यात तीन वर्षांचा करार झाला असून त्यापोटी राज्य सरकार ब्रिटन सरकारला भाडे देणार आहे. ही वाघनखे शुक्रवार दि. 19 जुलैला सातार्‍यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. या वाघनखांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखं ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे वाघनखांबाबत सातारकरांसह सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वाघनखांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, तसेच अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Historical tiger fight in Satara on Friday
शिवप्रताप दिन विशेष : शिवाजी महाराज यांची वाघनखे आहेत कुठे?

शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा संग्रहालय परिसरात वाघनखांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत होणार आहे. संग्रहालय पाहणी आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये पुढील कार्यक्रम पार पडणार आहे. वाघनखांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर संग्रहालय परिसरात स्वच्छता तसेच तेथील अतिक्रमणेही हटवण्यात आली आहेत. प्रत्येक विभागावर एक-एक जबाबदारी दिली गेली आहे. सध्या वाघनखं किंवा संग्रहालय पाहणीस येणार्‍या पर्यटक व इतिहासप्रेमींच्या वाहन पार्किंग करण्याच्या ठिकाणाची तयारी सुरु आहे. एकंदर वाघनखं स्वागताची जय्यत तयारी जिल्हा प्रशासन करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news