

सातारा : जर विद्यार्थी शिकले तर उद्या मंत्री, संशोधक होऊ शकतात. शिक्षण हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक असून विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षणाला चांगले महत्व दिले आहे. शिक्षणासाठी अनेक विविध योजना सरकारने सुरु केल्या असून यामुळे शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल. सरकारी शाळांचा दर्जा वाढवला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ना. एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारने व शिक्षण विभागाने शाळा प्रवेशोत्सव उपक्रम सुरु केला तो राज्यभर राबवला जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यात उत्साह दिसून येत आहे. मुलांमधील भीती निघून गेली पाहिजे. टेन्शन घेऊन शिक्षण पूर्ण होत नाही. कोडोली शाळेतील विद्यार्थी उद्या मंत्री, संशोधक होऊ शकतो. शिक्षण हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. त्यांनी शिकले पाहिजे. मंत्री दादा भुसे यांनी शिक्षणाला चांगले महत्व दिले आहे. शिक्षणासाठी अनेक योजना सरकारने सुरु केल्या आहेत. शिक्षण दर्जा उंचावेल. सरकारी शाळांचा दर्जा वाढवला जाणार आहे.