टेंभू धरणात बुडून मुलीचा मृत्यू

रंगपंचमी खेळताना घडली दुर्घटना; चार तासानंतर सापडला मृतदेह
टेंभू धरणात बुडून मुलीचा मृत्यू
Pudhari File photo
Published on
Updated on

कराड : टेंभू (ता. कराड) येथील धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा धरणात बुडून मृत्यू झाला. बुधवार दि. 19 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धरणाच्या टप्पा क्रमांक एक ‘ब’ जवळ ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, सुमारे चार तासांनंतर संबंधित युवतीचा मृतदेह आढळून आला.

जुही घोरपडे (रा. कराड) असे तिचे नाव आहे. ती मित्रांसोबत टेंभू धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी गेली होती. रंगपंचमी खेळत असताना युवतीसह तिच्या दोन सहकार्‍यांचा पाय घसरल्याने ते धरणाच्या पाण्यात पडले. त्यावेळी इतर मित्रांनी पाण्यात पडलेल्या दोघांना वाचवले. मात्र, जुही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली. त्यामुळे तिला वाचविण्यात मित्रांना अपयश आले.

घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलिस

ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच टेंभू ग्रामस्थांसह कराडमधील नागरिकांनीही घटनास्थळाकडे धाव घेतल्याने धरण परिसरात गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जुहीचा मृतदेह शोधला. या घटनेची नोंद कराड तालुका पोलिसात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news