Shambhuraj Desai |व्यावसायिकांसाठी 20 टक्के गॅस सिलिंडर साठा: ना. शंभूराज देसाई

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरेसे
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai(File Photo)
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यातील विविध व्यावसायिकांसाठी 20 टक्के गॅस सिलिंडर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. जिल्ह्यात गॅस सिलिंडरची कुठेही टंचाई नसल्याने नागरिकांनी गोडावून किंवा गॅस एजन्सीजबाहेर रांगा लावू नयेत. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा शिल्लक असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पर्यटन मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने उपस्थित होत्या.ना. शंभूराज देसाई म्हणाले, गॅस, पेट्रोल व डिझेलसंदर्भात जिल्हा प्रशासन, पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता जिल्ह्यात पुरेसा साठा शिल्लक असून पुरवठा सुरळीत सुरु आहे. जिल्ह्यात इंधनाची कुठही टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी गोडावून तसेच एजन्सीजबाहेर रांगा लावू नयेत. पेट्रोल व डिझेलचा जिल्ह्यात पुरेसा साठा शिल्लक आहे.

क्रेडिटवर पेट्रोल व डिझेल न देण्याबाबत तेल कंपन्यांचे राष्ट्रीय धोरण आहे. मात्र एका दिवसाचे क्रेडिट पंपचालकांना देण्यात येणार असल्याचे कंपन्यांच्या विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी आवश्यकतेपेक्षा जादा पेट्रोल व डिझेल घेऊ नये. धोका असल्याने इंधनाची साठवणूक करु नये. इंधन विक्री मर्यादेबाबत पंपचालकांना बंधन घालण्यात आलेले नाही. भविष्यातील परिस्थितीचा विचार करता रॉकेल वितरणाची तयारी शासनाने केली आहे. इंधनासाठी नागरिकांनी कुठेही रांगा लावू नयेत, असे आवाहन ना. शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत विरोधात मतदान

करणाऱ्या सदस्यांवरील कारवाईबाबत विचारले असता ना. शंभूराज देसाई यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाचे प्रमुख कारवाई करणार आहेत. पक्षनेता असल्यामुळे मी व्हीप बजावला होता. पक्षश्रेष्ठी यावर लवकरच निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.पाटणमधील डोंगरी महोत्सवाबाबत विचारले असता, ना. शंभूराज देसाई म्हणाले, डोंगरी महोत्सवात पोवाडे, भजन, ब्रास ब्रँड, लावणी महोत्सव, मराठी-हिंदी कार्यक्रम, पॅराग्लायडिंग, बोटिंग, हॉर्स रायडिंग, कॅमल राईड, बग्गी राईड, फनफेअर, कृषी प्रदर्शन, महिला बचत गट मेळावा, पशु-पक्षी प्रदर्शन आहे. डोंगरी भागातील लोकांना महोत्सवात सहभागी होता यावे यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news