Gambling Raid | वरकुटे-मलवडी येथे जुगार अड्ड्यावर छापा; अकरा जणांना अटक

3 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Gambling Raid |
वरकुटी-मलवडी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून म्हसवड पोलिसांनी संशयितांना (बुरखाधारी) अटक केली.Pudhari Photo
Published on
Updated on

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी छापा टाकून सुमारे 3 लाख 12 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 11 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

कबीर विठ्ठल बनसोडे, अर्जुन सर्जेराव यादव, सचिन अंकुश यादव, गणेश दिगंबर बनसोडे, विजय भानुदास जगताप, विकास हरी यादव, नानासो रामचंद्र मंडले, बाळासाहेब रावसाहेब मिसाळ, संभाजी मल्हारी मंडले, सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे, शिवाजी राम मिसाळ (सर्व राहणार वरकुटे मलवडी) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरकुटे-मलवडी येथे जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणार्‍या 11 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 3 लाख 12 हजार 670 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर, देवानंद खाडे, रूपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव, श्रीकांत सुद्रिक, पोलिस मित्र नारनवर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news