Satyajitsinh Patankar | सत्यजितसिंह पाटणकरांना संपूर्ण ताकद देणार

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांकडून आश्वासन; पाटण मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी सहकार्य ग्वाही
Satyajitsinh Patankar |
मुंबई : सत्यजितसिंह पाटणकर यांनी आपल्या हजारो समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भाजपा प्रवेश केला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. अतुल भोसले आदी मान्यवर.Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई/पाटण : सत्यजितसिंह पाटणकर यांचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सत्यजितसिंह पाटणकर यांचे पक्षात स्वागत केले. आपल्या पाठीमागे पक्षाची व महायुती शासनाची ताकद पूर्णपणे उभी केली जाईल व पाटण मतदारसंघाचा सर्वांगीण सार्वत्रिक विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना दिले.

मुंबई येथे मंगळवारी हा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राज्यमंत्री दर्जा प्राप्त भरत पाटील, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, उद्योजक याज्ञसेन पाटणकर, विधानसभा प्रचार प्रमुख विक्रमबाबा पाटणकर आदी उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. रवींद्र चव्हाण म्हणाले, सत्यजित पाटणकर यांचे कार्यकर्तृत्व अनेक वर्षांपासून ऐकून होतो. त्यांच्या रूपाने सातारा जिल्हा व प्रामुख्याने पाटण मतदारसंघात पक्षाला एक आश्वासक चेहरा मिळाला आहे. पक्षात त्यांचे स्वागत असून पाटण मतदारसंघाला सार्वत्रिक न्याय मिळवून देताना सत्यजित पाटणकर यांच्या पाठीमागे सर्व प्रकारची ताकद उभी केली जाईल. त्यांनीही मतदारसंघात तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवावा. पक्षाची ध्येयधोरणे, सार्वजनिक विकास हा पोहचवून पक्ष बांधणीसाठी अधिकाधिक मेहनत घ्यावी. त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, महत्वकांक्षा पूर्ण केल्या जातील. पाटण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच उद्देश ठेवून त्यांनी केलेला भाजपा प्रवेश हा स्थानिक जनतेसाठी अभिमानास्पद आणि आश्वासक राहील याची हमी देतो.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, मागील अनेक महिन्यांपासून आमची सत्यजित पाटणकर हे भाजपात पक्षात यावेत ही राजकीय व सामाजिक अपेक्षा होती. पाटण मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील असतो. आता तर पाटणकर यांचा भाजपा प्रवेश झाल्याने त्यांच्या पाठीमागे सर्व प्रकारची ताकद आम्ही निश्चितपणे उभी करून पाटणच्या विकासाचा अनुशेष भरून काढत एक आयडियल मतदारसंघ निर्माण करण्यासाठी सत्यजीतदादांच्या पाठीमागे ताकद उभी करू.

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पाटणकर घराण्याची आदर्श आणि संस्काराची परंपरा कायमच आहे. आता सत्यजित पाटणकर यांच्या प्रवेशामुळे भाजपालाही जिल्ह्यात चांगलेच राजकीय बळ प्राप्त झाले आहे. यापुढे पाटण मतदारसंघासह सातारा जिल्ह्याचा राजकीय सामाजिक व सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिकाधिक सुखकर होईल. यात पाटण मतदारसंघातला नक्कीच झुकते माप देऊन सत्यजित पाटणकर यांच्या पाठीमागे सार्वत्रिक ताकद उभी करण्याचा आम्ही महायुती शासन व प्रामुख्याने भाजपा पक्षाच्या वतीने प्रयत्न करणार आहोत.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पाटण मतदारसंघातील प्रलंबित पुनर्वसनाचे प्रश्न, धरणांची रखडलेली कामे, बंद पडलेले पर्यटन व अन्य प्रकल्प, वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान, हल्ले, दर्जाहीन कामे, हुकूमशाही, झुंडशाही, प्रशासकीय एकतर्फी कारभार या सर्व अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी व सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आमच्या सहकार्‍यांसह भाजपा पक्षात प्रवेश केला आहे.

जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आभार केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र व प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील मान्यवर आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी तसेच पाटणकर गटाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने मुंबई येथे उपस्थित होते.

मुंबई : सत्यजितसिंह पाटणकर यांनी आपल्या हजारो समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भाजपा प्रवेश केला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. अतुल भोसले आदी मान्यवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news