Satara Fraud Case: सोने, मोबाईल खरेदी करुन फसवणूक

सातार्‍यातील ज्वेलर्स दुकानात व मोबाईल शॉपीमध्‍ये सोने व मोबाईल खरेदी केल्‍यानंतर ऑनलाईन पैसे पाठवल्‍याचे भासवण्यात आले.
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

सातारा : सातार्‍यातील ज्वेलर्स दुकानात व मोबाईल शॉपीमध्‍ये सोने व मोबाईल खरेदी केल्‍यानंतर ऑनलाईन पैसे पाठवल्‍याचे भासवण्यात आले. मात्र खरेदी केलेल्‍या वस्‍तूचे पैसे व्‍यवसायिकांना मिळाले नाहीत. यावरुन सातार्‍यात दोन गुन्‍हे दाखल झाले आहेत.

पहिली घटना रांका ज्‍वेलर्सच्या दुकानात घडली आहे. २७ जून रोजी ही घटना घडली आहे. अनोळखी युवक ज्वेलर्स दुकानात आल्‍यानंतर त्‍याने ३ लाख ४८ हजार रुपये किंमतीची २३ ग्रॅम वजनाची सोन्‍याची चेन घेतली. संशयिताची ते पैसे एनईएफटी केले असल्‍याचा स्क्रीन शॉट दुकानदाराला दाखवला. त्‍यानुसार संशयित सोन्‍याची चेन घेवून गेला. मात्र बँक खात्‍यामध्ये पाहिले असता एनईएफटीचे पैसे जमा झाले नव्‍हते. यावरुन नितीन मुकुंदराव दिंडोरकर (वय ५३, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दुसरी घटना पोवई नाका येथे २७ जून रोजी एसएस मोबाईल दुकानात अशाच पध्दतीने घडली आहे. अनोळखी युवकाने मोबाईल दुकानातून १ लाख ७५ हजार रुपयांचा मोबाईल घेतला. त्‍याचे पैसे ऑनलाईन पध्दतीने पाठवले असल्‍याचा बनावट स्क्रीनशॉट दुकानदराला दाखवला. त्‍यानुसार संशयित तेथून मोबाईल घेवून गेला. मात्र ऑनलाईन पैसे आले नसल्‍याचे दुकानदाराच्या लक्षात आले. फसवणूक झाल्‍याने याप्रकरणी भुपेंद्र जयकुमार शहा (वय ४१, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्‍यान, एकाचवेळी सातार्‍यात दोन्‍ही घटनेत ५ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. संशयित आरोपी कोण? दोन्‍ही घटनेत एकच की वेगवेळे संशयित आहेत? यापूर्वी आणखी कुठे फसवणूक केली आहे का? असे सवाल उपस्‍थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news