Karad FDA Raids: कराडमधील सहा हॉटेलवर अन्न - औषध प्रशासनाचे छापे

दोन हॉटेलचे परवाना रद्द; चार हॉटेलवर कारवाईने खळबळ
FDA Raid
FDA RaidPudhari
Published on
Updated on

कराड : कराड शहरातील नामांकित हॉटेलसह सहा हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी छापे टाकले. यामध्ये मुदतबाह्य बियर व कोल्ड्रिंक्स विक्री केली जात असल्याचे समोर आल्याने दोन हॉटेलवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करत हॉटेल बंद ठेवण्याची सूचना केली. अन्य चार हॉटेलवर दंडात्मक कारवाई केली असून रात्री उशिरापर्यंत या कारवाईबाबद्दल गुप्तता पाळल्याने अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती.

हॉटेलमध्ये अन्नपदार्थ शिजवणारी ठिकाणी तसेच अन्य बाबींची तपासणी करत विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा याच समावेश होता. हॉटेलमधील परमिट रूम व बियर बार मध्ये मुदतबाह्य बियर व कोल्ड्रिंक्स विक्री केली जात असल्याचे समोर आल्याने दोन हॉटेलवर कारवाई झाली. संबंधित ठिकाणांचे परवाने रद्द करत दोन्ही हॉटेलला विक्री बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. अन्य चार हॉटेलमध्ये काही त्रुटी आढळून आले असून संबंधित हॉटेलवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हॉटेलच्या नावाबाबत गुप्तता

अधिकाऱ्यांनी सहा ठिकाणी छापे टाकून हॉटेल तसेच परमिट रूम, बियर बारची पाहणी केली. अन्न व औषध प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांंचे तंतोतंत पालन न करणे तसेच अन्य काही त्रुटी आढळून आल्या आहेत; मात्र असे असले तरी उशिरापर्यंत स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले असून या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news