Shivendraraje Bhosale: गोडोली नाक्यावरील कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल

अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्यासाठी पाहणी करावी व त्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत
Shivendraraje Bhosale
Shivendraraje bhosalePudhari Photo
Published on
Updated on

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासाठी नवीन इमारत उभारण्यास मंजुरी दिली. त्यासाठी १०.९७ कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सातार्‍यात ही साजेशी भव्य वास्तू साकारण्यात येणार आहे. गोडोली नाक्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोवई नाका ते अजिंठा चौक यादरम्यान उड्डाणपूल उभारण्यावर सकारात्मक चर्चा झाली. करंजे नाका येथील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्यासाठी पाहणी करावी व त्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकार्‍यांना दिले.

सातार्‍यातील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी शिवेंद्रराजे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव, उपअभियंता रवींद्र आंबेकर, शाखा अभियंता रूपेश नरवर उपस्थित होते.

सातार्‍यात अधीक्षक अभियंता कार्यालयाची नवी इमारत बांधली जाणार आहे. इमारत आराखड्यासाठी वास्तुविशारदांमध्ये स्पर्धाही घेण्यात आली. या विकासकामामुळे सातार्‍याच्या वैभवात भर पडणार आहे. गोडाली नाका येथे सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यासाठी पोवई नाका-गोडोली नाका ते अजिंठा चौक यादरम्यान उड्डाणपूल उभारण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश शिवेंद्रराजे यांनी अधिकार्‍यांना दिले.

करंजे नाका येथेही वाहतूक समस्या निर्माण होऊन अपघात होत असतात. त्यामुळे करंजे नाका ते म्हसवे रोड येथे अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्यावर चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news