सातार्‍यात तुफान हाणाहाणी

एमआयडीसीत ट्रकचालकांना मारहाण
Big Fightning In Satara
सातार्‍यात तुफान हाणाहाणीPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा शहरालगत एमआयडीसी येथे पाच चोरट्यांनी अक्षरश: धुडगुस घालत ट्रकचालकांना टार्गेट करत दरोडे टाकले. यावेळी पाच जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करत भरदिवसा रोकड लुटली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मुख्यमंत्री सातार्‍यात असतानाच रविवारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना दि. 18 ऑगस्ट रोजी भरदुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बसवराज फकीरआप्पा गुजनाल (वय 30, रा. शहाबंदर, जि. बेळगाव) यांनी पाच अनोळखी युवकांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, तक्रारदार गुजनाल हे सातारा एमआयडीसी येथे कंपनीत साहित्य घेऊन आले होते. ट्रक गोडावूनमध्ये असताना ते चालत चहा पिण्यासाठी रस्त्यावर आले. यावेळी दुचाकीवरुन अनोळखी पाच युवक तेथे आले. ‘तू बिहारचा आहेस का? तुझ्याकडील पैसे काढ,’ असे म्हणत मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. अचानक पाच जणांनी लाकडी दांडक्याने हल्ला केल्याने तक्रारदार गुजनाल घाबरले. संशयित टोळक्याने मारहाण करत गुजनाल यांच्या खिशातील 500 रुपये काढून घेत पळ काढला.

लग्‍नाच्या दिवशीच वधूने केली मारामारी!

यानंतर तक्रारदार गुजनाल हे ट्रकजवळ आले व भावाला घडलेल्या घटनेची माहिती दिली. यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली. त्यावेळी आणखी काही ट्रक चालकांनाही अनोळखी टोळक्याने मारहाण करुन जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याचे समोर आले. तक्रारदार गुजनाल यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयितांचे वर्णन घेतले. या टोळक्याच्या हल्ल्यात एक ट्रक चालक जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजले.

Big Fightning In Satara
सांगली : जि. प. अध्यक्षांच्या बंगल्यात राडा, पदाधिकारी, सदस्यांत मारामारी

मुख्यमंत्री असतानाच दरोडेखोरांचा धुमाकूळ

रविवारी सातार्‍यात मुख्यमंत्री, गृहमंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पोलिसांचा सातार्‍यात तगडा बंदोबस्त होता; मात्र एमआयडीसी असुरक्षित होती. भरदिवसा 500, 1000 रुपयांसाठी दरोडेखोर ट्रकचालकांना गाठून मारहाण करत लुटत होते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Big Fightning In Satara
कोल्हापूर : कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी; जन्मठेप भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू

दरोडेखोरांची धरपकड

रविवारी घडलेल्या या घटनेनंतर बंदोबस्ताचे काम संपल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी तत्काळ दरोडेखोरांची माहिती घेऊन शोधमोहीम राबवली. तक्रारदारंनी चोरट्यांचे वर्णन दिल्याने त्यावरून पोलिसांना मोठा क्लू मिळाला. सोमवारी दुपारपर्यंत पोलिसांची शोधमोहीम सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार काहीजणांची धरपकड करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news