

कराड : आखाती देशातील युद्धाचा फटका राज्यातील मासेमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. युद्धामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारावर परिणाम झाला असून मासे इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये पोहोचवण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच आता मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे समुद्रबंदी लागू होणार आहे. या काळात मासेमारीवर बंदी असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाता येत नाही.
पुढील काही महिन्यांत मासळीचा पुरवठा आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून व्यावसायिकांचा खर्च वाढल्याने नाईलाजाने दरवाढ करावी लागत आहे. त्यामुळे मासेप्रेमींच्या खाण्यावर मर्यादा येत आहेत.
युद्धामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. समुद्रातील मासे इतर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात वितरित करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मासळीचा पुरवठा कमी झाल्याने बाजारात समुद्रातील मासे कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मासेप्रेमींना समुद्रातील ताजे मासे कमी प्रमाणात मिळत असून अनेक ठिकाणी मासळीची टंचाई जाणवू लागली आहे. मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे समुद्रबंदी लागू होणार आहे. या काळात मासेमारीवर बंदी असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाता येत नाही. पुढील काही महिन्यांत मासळीचा पुरवठा आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्राहकांची संख्या कमी
मासे इतर भागात पोहोचवण्यासाठी वाहतूक खर्च वाढत असल्याने व्यापाऱ्यांना मासळीचे दर वाढवावे लागत आहेत. मात्र, वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांची संख्या कमी होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहक मासळी खरेदी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. परिणामी, मासे विक्रेते, व्यापारी आणि मच्छीमार या तिघांनाही आर्थिक फटका बसत आहे.
कराडमध्ये विक्रीसाठी येणारे मासे
सुरमई, पापलेट, रावस, बांगडा, कोळंबी, हलवा, मांदेली, तारली, ओला बोंबिल, समुद्री खेकडा, टुना तसेच सुक्या मासळीमध्ये बोंबिल, सुकट, खारा मासा यांचा समावेश आहे.