Educational scholarship history: कर्मवीरांकडून शाहू महाराजांच्या नावाने पहिली स्कॉलरशिप

ऐतिहासिक संशोधनातून उजाळा : ‌‘पुढारी‌’ ठरला साक्षीदार
Educational scholarship history: कर्मवीरांकडून शाहू महाराजांच्या नावाने पहिली स्कॉलरशिप
Published on
Updated on
सागर गुजर

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था आणि सातारच्या छत्रपती घराण्यातील ऐतिहासिक संबंधांचा नवा अध्याय संशोधनातून समोर आला आहे.

इतिहास संशोधक प्रथमेश हणमंत हबळे यांनी केलेल्या संशोधनानुसार दैनिक ‌‘पुढारी‌’च्या मंगळवार, दि. 27 जुलै 1943 च्या अंकातून महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावे प्रकाशात आले. सातारच्या छत्रपती शाहू महाराजांनी धनिनीची बाग अण्णांच्या वसतिगृहाला दिली होती. पुढे अण्णांनी याची कृतज्ञता व्यक्त करताना छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने पहिलीच स्कॉलरशिप सुरू केली. याचे नवीन पुरावे या संशोधनात पुढे आले आहेत.

कर्मवीर भाऊराव पाटील व सातारच्या राजघराण्याचे ऋणानुबंध महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामजिक इतिहासातील सोनेरी पान म्हणून ओळखले जाते. साताऱ्यातील इतिहास संशोधक प्रथमेश हणमंत हबळे यांनी केलेल्या सखोल संशोधनातून हे अप्रकाशित इतिहासाचे नवीन दस्तऐवज उपलब्ध झाले आहेत.

वटवृक्षाची सुरुवात धनिनीच्या बागेतूनच

संस्थेने 1947 साली सुरू केलेल्या महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेंन्शिअल हायस्कूलकरता फलटणचे श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी सातारा कॅम्पमधील आपला फलटण लॉज बंगला व तिथली 10 एकर जागा दिली. तसेच इंदूरचे संस्थानिक श्रीमंत तुकोजीराव होळकर यांनी वाफगावचा त्यांचा भव्य राजवाडा आणि त्याच्या आसपासची जमीन दि. 31 ऑगस्ट 1955 रोजी संस्थेला बक्षिसपत्र करुन दिली. नंतर अनेक संस्थानिकांनी रयत शिक्षण संस्थेला देणग्या दिल्या; परंतु या सर्व विशाल वटवृक्षाची सुरुवात ही धनिनीच्या बागेतून झाली आहे हे वास्तव नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news