डी. पी. जैन कंपनीच्या स्टोअरला आग

धोंडेवाडी येथील घटना; पीव्हीसी पाईपसह अन्य साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान
Fire Incident |
धोंडेवाडी : आगीत जळालेले साहित्य व आग विझवताना अग्निशमनदलाचे जवान.Pudhari Photo
Published on
Updated on

उंडाळे : कराड- चांदोली रोडवर धोंडेवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत असलेल्या डी.पी. जैन कंपनीच्या साहित्य ठेवलेल्या स्टोअरला अचानक आग लागली. या आगीत कंपनीचे पीव्हीसी, एच. डी. व बांगडी पाईपसह अन्य साहित्य जळून खाक झाले. गुरुवार दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता घडलेल्या घटनेत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटने लागली असे बोलले जात असले तरी आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यामुळे तर्क - वितर्क लढवले जात आहेत. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम डीपी जैन ही कंपनी करत आहे. या कंपनीचे संपूर्ण रॉ मटेरियल व साहित्य बनवण्यासाठी धोंडेवाडी, काले येथे त्यांनी जागा भाड्याने घेतली आहे. या जागेत रस्त्यासाठी लागणारे साहित्य साठवून ठेवले आहे. तसेच येथे सिमेंट पुलाचे कठडे व अन्य साहित्य येथेच बनवले जाते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात साहित्य आहे.

सध्या डीपी जैन कंपनीचे रस्त्याचे व पुलाचे कामकाज पूर्ण होत आल्याने येथील बहुतांश साहित्य हलवण्यात आले आहे. परंतु सध्या शेवटच्या टप्प्यात पूल बांधणीतील पाणी निचरा करण्यासाठी लागणार्‍या पीव्हीसी, एच. डी., बांगडी पाईपचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आला आहे. याच पाईपला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यातील पीव्हीसी, बांगडी पाईप आगीत जळूल खाक झाल्या. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याने आगीचे रौद्ररूप दिसून येत होते.

त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ रस्त्यावरून ये-जा करणारे प्रवासी यांनी मोठी गर्दी केली. या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर तेथील कामगारांनी तातडीने स्टोअर शेजारील अन्य माल स्टोअरनजीक ठेवण्यात आलेले ऑईल, प्लास्टिक साहित्यापासून इतरत्र? हलवले. अग्निशमन दलाने प्रयत्नाची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला.

सुमारे दोन तासांनंतर आग आटोक्यात...

सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. कराड नगरपालिकेच्या व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमनदलाने या आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी कामगारांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केली. तोपर्यंत लाखो रुपयांची पीव्हीसी व काळी एच. डी., बांगडी पाईप जळून गेली. यापैकी काही पाईप्स अर्धवट जळालेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आल्या आहेत; पण त्याचा कामासाठी कितपत उपयोग होणार, हा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news