कराड पालिकेची अंतिम मतदार यादी जाहीPudhari File Photo
सातारा
Karad Municipal Council | कराड पालिकेची अंतिम मतदार यादी जाहीर
कराड नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. त्यानुसार शहरात 69,800 मतदारांची नोंद आहे.
कराड : कराड नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. त्यानुसार शहरात 69,800 मतदारांची नोंद आहे.
पालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर सुमारे 2,800 हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने एका प्रभागातील नावे दुसर्या प्रभागात गेल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत कार्यवाही करून पालिका प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.
त्यानुसार प्रभाग 1 मध्ये 4049, प्रभाग 2 मध्ये 3480, प्रभाग 3 मध्ये 3941, प्रभाग 4 मध्ये 3508, प्रभाग 5 मध्ये 5620, प्रभाग 6 मध्ये 4912, प्रभाग 7 मध्ये 3904, प्रभाग 8 मध्ये 4949, प्रभाग 9 मध्ये 5910, प्रभाग 10 मध्ये 4964, प्रभाग 11 मध्ये 4443, प्रभाग 12 मध्ये 5703, प्रभाग 13 मध्ये 3414, प्रभाग 14 मध्ये 4120, प्रभाग 15 मध्ये 6883 मतदार आहेत.

