Jewellery Fraud | दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धेला लाखाचा गंडा

बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jewellery Fraud |
Jewellery Fraud | दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धेला लाखाचा गंडा(Pudhari File Photo)
Published on
Updated on

वेणेगाव : अपशिंगे मि. (ता. सातारा) गावच्या हद्दीत दोन अनोळखी इसमांनी चमकण्याची पावडर घेता का? असा बहाणा करून तांब्याचे ताट व जोडवी चमकून देतो, असे सांगत वृद्ध महिलेला गंडा घातला. या महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या घेऊन त्यातील सोने वितळून 1 लाख 2 हजार रुपयांची फसवणूक केली.

घटनेची फिर्याद रंजना तानाजी जाधव (वय 70) रा. अपशिंगे मि. यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. रंजना जाधव यांच्या घरासमोर अंगणात दोन अनोळखी इसम येऊन चमकण्याची पावडर घेता का? अशी आर्जव करत होते. हे दोघे या बहाण्याने घरामध्ये आले. तांब्याचे ताट व जोडवी चमकून देतो, असा विश्वास संपादन करून त्यांनी रंजना यांच्या हातातील 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या घेतल्या. त्या चमकवण्यासाठी पावडर व लाल रंगाचे पाणी टाकून थोड्या वेळाने त्या काढून त्यांच्या जवळील हळदीच्या डब्यात घालून दिल्या. थोड्या वेळाने काढून ठेवा असे सांगून त्या अनोळखी इसमांनी तेथून पोबारा केला.

काही वेळाने सौ. रंजना जाधव यांनी डबा उघडून पाहिला असता त्या मऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नातवास नागठाणे येथे जाऊन सोनाराच्या दुकानात खात्री करण्यासाठी पाठवले. यावेळी बांगड्याचे वजन पाहिले असता ते 33 ग्रॅम भरले. 50 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या घेऊन भामट्यांनी त्यातील 17 ग्रॅम वजनाचे सोने वितळून घेऊन 1 लाख 2 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या घटनेत दोघां अनोळखी इसमावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक कारळे करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news