Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंची तोफ आज धडाडणार

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ सोमवार, दि. 20 रोजी साताऱ्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर धडाडणार आहे
Eknath Shinde
उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे. File Photo
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ सोमवार, दि. 20 रोजी साताऱ्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर धडाडणार आहे.

सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. ना. एकनाथ शिंदे सकाळी तीर्थक्षेत्र अंगापूर गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक होणार असून, त्यानंतर ते गांधी मैदान राजवाडा येथे होणाऱ्या जाहीर सभास्थळी दाखल होणार आहेत.

सभेला ना. उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, सहसंपर्क प्रमुख हनुमंत जगदाळे, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, सातारा जि. प. चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, महिला आघाडी संपर्कप्रमुख सौ. रेश्माताई जगताप, जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, जयवंतराव शेलार, चंद्रकांत जाधव उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या निवडून आलेल्या 15 व 30 पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news