

पाटण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनवीन शैक्षणिक धोरण अवलंबले असून त्याचा चांगला फायदा मुलांच्या शिक्षणासाठी होत आहे. मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. मुलींसाठी कमवा व शिका योजनेला बळ देणार आहे. दरमहा पाच लाख मुलींना दोन हजार रुपये पॉकीटमनी म्हणून मिळाले पाहिजेत. डोंगरदऱ्यातून येणाऱ्या मुलींना राहण्याची गैरसोय होवू नये यासाठी मुलींच्या वसतिगृहासाठी प्राधान्य देवू. उषा योजनेतही कोयना एज्युकेशन सोसायटीचा विचार केला जाईल, असे आश्वासन उच्च तंत्रज्ञान व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
येथील कोयना एज्युकेशन सोसायटीच्या बी.डी.कॉलेज येथे विविध नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ, नवीन अद्ययावत संगणक प्रयोगशाळा आणि विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ.अतुलबाबा भोसले, शिवाजी विद्यापीठाचे माजी संचालक अमित कुलकर्णी, भाजपाचे राज्य सदस्य व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, कोयना एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, जाईंट सेक्रेटरी सुहास देशमुख, संचालक याज्ञसेन पाटणकर व संजीव चव्हाण, राजभाऊ शेलार, हिंदूराव पाटील, अभिजित पाटील, सुभाषराव पवार, हिंदूराव सुतार, ॲड. अविनाश जानुगडे, बाळासाहेब राजेमहाडीक, नगराध्यक्षा सौ. अनिता देवकांत, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, दिनकर घाडगे, पूजा कदम, रविंद्र पाटील, सचिन जाधव यांची उपस्थिती होती.
ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात व राज्यात शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच डिजिटल क्षेत्रात देश अग्रगण्य बननण्यासाठी विशेष भर दिला आहे.
आ. डॉ.अतुलबाबा भोसले म्हणाले, महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवण्याचे काम चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. कोयना एज्युकेशन सोसायटी विद्यार्थ्यांना नवनवीन शैक्षणिक ज्ञान कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, कोयना एज्युकेशन सोसायटीचा 30 वर्षाचा पत्र्याच्या शेडमधून ते आतापर्यंतचा अद्ययावत इमारतीपर्यंतचा प्रवास सर्वांनी पाहिला आहे हे काय सहज शक्य झाले नाही. आज संस्थेच्या 27 शाखांच्या इमारती अत्याधुनिक झाल्या आहेत.
प्रास्ताविक संचालक संजीव चव्हाण यांनी केले. याज्ञसेन पाटणकर यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ.शिरीष पवार यांनी आभार मानले.