Satara News : महामानवाला अभिवादनासाठी लोटला अलोट जनसागर

जिल्ह्यात संचारले निळे वादळ: दिवसभर भीम अनुयायींची वर्दळ
Satara News
सातारा : शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अभिवादनासाठी लोटलेला जनसागर.
Published on
Updated on

सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जिल्ह्यात विधायक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. महामानवाला अभिवादन करण्यासाठी बहुजन समाज व संघटनांसह अवघा जनसागर लोटला होता. सातारा शहरातील चौका-चौकात उभारलेल्या स्टेजवर भीमदर्शनासाठी अनुयायींची दिवसभर वर्दळ सुरू होती. निळे झेंडे, पताकांसह काढलेल्या रॅली व मिरवणुकीमुळे राजधानी साताऱ्यासह जिल्ह्यात निळे वादळ संचारले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय स्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समता सप्ताह तसेच समता दिंडीचे आयोजन केले होते. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिसप्रमुख तुषार दोशी, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवारी सायंकाळी मिरवणुकांना प्रारंभ झाला. प्रचंड उत्साह व जल्लोषात रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. जरंडेश्वर नाका येथील रमाई स्मारक परिसरातही विविध कार्यक्रम पार पडले. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून भीमोत्सवाचा माहोल तयार झाला होता. भीमोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम पार पडले. सातारा शहरातील राजपथावरील शाहू चौक परिसर, जरंडेश्वरनाका-भीमाई स्मारकासह चौका-चौकात चौथरे उभारुन भीमप्रतिमा प्रस्थापित करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news