Marathi Language Day: कुठे साहित्य अभिवाचन तर कुठे ग्रंथप्रदर्शन

जिल्ह्यात मराठी भाषा दिन साजरा : विविध उपक्रमांचे आयोजन
Marathi Language Day
Marathi Language Day: कुठे साहित्य अभिवाचन तर कुठे ग्रंथप्रदर्शनPudhari
Published on
Updated on

सातारा : कवी कुसुमाग्रज यांची जयंती म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा साजरा होत असून जिल्ह्यातही ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुठे वक्तृत्व, निबंध लेखन स्पर्धा साहित्य अभिवाचन ग्रंथ प्रदर्शन, तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ‌‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी‌’चा सूर आज जिल्ह्यात कानी पडत होता.

साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. गतवर्षीच मायबोली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा गौरव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये व कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मराठी भाषेचा वारसा जपण्याची शपथ घेत कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्य कृतींचे वाचन करण्यात आले. निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतींचे वाचन करण्यात आले.

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन वि. वा. शिरवाडकर यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन व त्यांच्या साहित्य अभिवाचनाने साजरा करण्यात आला. पांडुरंग मोहिते, वाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, विश्वस्त अनंत जोशी, डॉ. राजेंद्र माने, पद्माकर पाटकजी , डॉ. ज्योत्सना कोल्हटकर, डॉ. संदीप श्रोत्री, अनुजा प्रभुणे, डॉ. वृंदा शिवदे, प्रा. श्रीधर साळुंखे, गौतम भोसले, सुषमा भिडे, प्रकाश शिंदे यांच्या उपस्थितीत वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्यातील निवडक भागांचे अभिवाचन करण्यात आले. भारतीय धम्म संघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मराठी भाषादिन साजरा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news