Eknath Shinde Patan visit: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटणमध्ये

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या समारोपास उपस्थिती; विकासकामांची उद्घाटने होणार
Eknath Shinde
Eknath Shinde File Photo
Published on
Updated on

सणबूर : कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा समारोप सोमवार दि. 6 एप्रिल रोजी होणार असून या समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते कोयना नदीवरील नवीन सांगवड पूल, स्वर्गीय शिवाजीराव देसाई स्मृती भवन (दौलतनगर) आणि शिवाजीराव दौलत स्टेडियम यासारख्या महत्त्वपूर्ण विकासकामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती ना. शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

समारोपाच्या दिवशी मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार उपस्थित राहणार असून ईशा मालवीय, प्रविण तरडे, स्पृहा जोशी, प्रियादर्शन जाधव, संस्कृती बालगुडे, गिरिजा प्रभू, जान्हवी किल्लेकर, योगिता चव्हाण, भाऊ कदम, हेमांगी कवी, अरुण कदम, रसिका वेंगुर्लेकर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, कविता राम, तेजपाल वाघ, अभिजीत जाधव, अमू जाधव, पूनम कुडाळकर, अर्चना जावळेकर, नमिता पाटील आणि अस्मिता पुनेकऱ आदींचा सहभाग असणार आहे.

दरम्यान, पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात साजरा होत असलेला ‌‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026‌’ हा संस्कृती, पर्यटन आणि उद्योजकतेचा संगम ठरत आहे. पारंपरिक कला, साहसी पर्यटन आणि अनुभवाधारित पर्यटन यांचा संगम साधत साताऱ्याच्या पर्यटन क्षमतेत भर घालण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवाचे उद्घाटन ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. त्यादिवशी सायंकाळी शाहीर संतोष साळुंखे, शाहीर प्रसाद विभुते, शाहीर डॉ. देवानंद माळी आणि शाहीर डॉ. निशिगंधा माने यांच्या पथकांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी वातावरण भारावून गेले.

4 एप्रिल रोजी स्वरांजली ब्रास बँड (लालबाग, मुंबई), प्रभात ब्रास बँड (पुणे), अमर ब्रास बँड (बारामती) आणि सरस्वती ब्रास बँड (जालना) यांच्या सादरीकरणामुळे संगीताची मेजवानी लाभली. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच बोटिंग, पॅराग्लायडिंग, फूड फेस्टिव्हल, विविध प्रदर्शन आणि सफारी यासारख्या उपक्रमांमुळे पर्यटकांना दिवसभर विविध अनुभव घेता येत आहेत. रविवारी महाराष्ट्राच्या पारंपरिक लावणी कलेचा बहारदार आविष्कार पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news