दहिवडी : मारहाणीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

दहिवडी : मारहाणीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या
Published on
Updated on

दहिवडी : पुढारी वृत्तसेवा

नरवणे, ता. माण येथे जुन्या वादाचा राग मनात धरुन एका युवकाला पाच जणांनी घरात घुसून मारहाण केली. या नैराश्यातून नितीन अशोक माने (वय 28) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पंकज सुदाम फडतरे, रंजना पंकज फडतरे, संतोष सुदाम फडतरे व अन्य दोघांविरुद्ध दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नितीन अशोक माने हा युवक मुंबई येथे रंगकाम करत होता. गावातील सचिन काटकर या मित्राच्या लग्नासाठी तो आठ दिवसापूर्वी गावाला आला होता. सटवाई मळा येथील वस्ती वर नितीन माने याचे घर आहे. त्याच्या बाजूलाच फडतरे कुटुंबीय राहत आहेत. नितीन हा मोटर बंद करण्यासाठी विहिरीकडे चालला असताना रंजना फडतरे यांनी जुन्या वादाचा राग मनामध्ये धरून त्याला शिवीगाळ करत त्याच्या अंगावर धावत जाऊन मारहाण केली. या मारहाणीत नितीन माने व रंजना फडतरे या दोघांनाही दुखापत झाली होती. त्या संबंधी दहिवडी पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध तक्रार दाखल झाली होती. दाखल झालेली तक्रार आपापसात समझोता करुन मागे घेण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास रंजना फडतरे यांचे पती पंकज फडतरे आल्यानंतर त्यांनी झालेल्या प्रकाराचा राग मनामध्ये धरून भाऊ संतोष आणि अन्य दोघांच्या मदतीने घरात घुसून नितीनला मारहाण केली. या मारहाणीच्या नैराश्यातून नितीनने वडाची विहीर या परिसरामध्ये वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात सागर माने यांनी फिर्याद दिली आहे. तपास सपोनि संतोष तासगावकर करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news