Dahivadi Accident: दहिवडीत दुचाकींची समोरासमोर धडक; युवक ठार

दहिवडी-शिंगणापूर मार्गावर भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

दहिवडी : दहिवडी-शिंगणापूर मार्गावर भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सुरज अनिल फासे (वय 35, रा. चावडी चौक, दहिवडी, ता. माण, जि. सातारा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज फासे हे वावरहिरे येथे कामावर जात असताना दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास दहिवडी-शिंगणापूर रोडवर शिंगणापूर चौकाच्या पुढे सुमारे 100 मीटर अंतरावर हा अपघात झाला.

शिंगणापूरकडून दहिवडीकडे येत असलेली मोटरसायकल (क्र. एमएच 11-डीक्यू 2469) चालक बबन भगवान चव्हाण (रा. मोही, ता. माण) यांनी समोरुन आलेल्या सुरज फासे यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात सुरज फासे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी मयताचे भाऊ आशिष अनिल फासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबन चव्हाण यांच्याविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातप्रकरणी पोलिसांनी एकाल ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस हवालदार बी. एस. खांडेकर करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news