

सातारा : आजच्या परिस्थितीत निसर्ग स्वतःहून चमत्कार घडवणार नाही, यासाठी आपल्यालाच उपाय शोधणे आवश्यक आहे. सतत वाढत जाणारे तापमान जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरत आहे. जीवाश्म इंधनाचा वापर, बेसुमार वृक्षतोड आणि लोकसंख्या ही तापमान वाढीची प्रमुख कारणे आहेत. वाढत्या लोकसंख्येवर आणि वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण अजूनही आपण 53% जीवाश्म इंधनावर अवलंबून आहोत.
हवामान बदलाचा शेतीवर परिणाम हवामान बदलामुळे 20 मध्ये अवकाळी पावसाने त्याचे घातक परिणाम दाखवले. दुष्काळ, अतिवृष्टी, भूस्खलन यांसारख्या घटना वारंवार घडत आहेत. हवामान बदल हे अशाश्वत शेतीचे मूळ कारण बनले आहे. यावर लक्ष देणे गरजेचे आहे. अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांसाठी अनुदान, आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई जाहीर होईल, पण हवामान बदल हे दीर्घकालीन संकट आहे. ही एक जागतिक समस्या आहे आणि नुकसान भरपाई हे केवळ तात्पुरते समाधान आहे.
ऊर्जा सुधारणा विधेयक ऊर्जा सुधारणा विधेयक ऊर्जा उद्योगाशी संबंधित आहे, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे शेतकर्यांना फायदा होईल. या विधेयकाच्या आधारावर राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागाने कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजनेसाठी कार्बन बाजारपेठ सुविधा कक्ष स्थापन केला आहे. यात आर्थिक विकास, सामाजिक विकास, पर्यावरण संरक्षण आणि अन्न सुरक्षा या विकासांना प्राधान्य दिले आहे. पर्यावरणीय र्हास आणि वाढत्या लोकसंख्येमुळे कृषी व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्या शेती व्यवसाय धोक्याचा बनल्यामुळे आणि उत्पन्नाचे दुसरे सुरक्षित साधन नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. भविष्यात पाण्याची कमतरता लक्षात घेता केळी आणि ऊसाची शेती अडचणीत येईल. हवामान बदलामुळे शेतकर्यांनी पीक बदलण्याची वेळ आली आहे. अतिवृष्टी हे हवामान बदलाचे प्राथमिक लक्षण आहे आणि महाराष्ट्राने त्याचे गंभीर परिणाम अनुभवले आहेत. जिथे अतिवृष्टी आहे, तिथे भूस्खलन अटळ आहे. आजही प्रत्येक क्षेत्रात आणि स्तरावर विजेची मागणी वाढत आहे आणि त्याचबरोबर प्रदूषणही वाढत आहे. वीज निर्मितीमध्ये अजूनही आपण 54% जिवाश्म इंधनावर अवलंबून आहोत.
उपाययोजना या संकटावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे, वृक्षारोपण करणे, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आणि शेतकर्यांना हवामान अनुकूल मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
बांबू शेतीतून देशाला प्रदूषण विरहित रिअल टाईम ऊर्जेची मिळू शकते. हवेतील कार्बण वायूची पातळी कमी करण्यासाठी बांबूला राष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन द्यावे लागेल. बांबू जलद वाढणारी, प्रती वर्षी आर्थिक उत्पन्न देणारी व प्रकाश संश्लेषणाद्वारे वातावरणातील कार्बण वायू वेगाने शोषूण घेणारी, हवेत ऑक्सिजन सोडणारी व बायोमास मातीमध्ये साठवण्यास मदत करणारी, शेतकर्यांस शाश्वत हमी भाव देणारी प्रजाती आहे.