Satara Civil Hospital: महिन्यात दोनदा मृतदेहांची अदलाबदल

सिव्हीलचा कंट्रोल सुटल्याने कारभार रामभरोसे ; रूग्णांचा जीव टांगणीला
Satara Civil Hospital
Satara Civil Hospital: महिन्यात दोनदा मृतदेहांची अदलाबदलPudhari
Published on
Updated on

सातारा : सातारा सिव्हीलमध्ये मार्च या एकाच महिन्यात शवविच्छेदन झाल्यानंतर दोनदा मृतदेह अदलाबदली करुन नातेवाईकांना दिल्याचे समोर आले आहे. अर्भक मृत्यू प्रकरणी देखील चार दिवसांपूर्वी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. सिव्हीलमध्ये एकामागून एक गंभीर कांड घडत आहे. मात्र, यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणताही धडा घेतलेला नाही. यामुळे सिव्हील हॉस्पिटल असंवेदनशील बनले असून राम भरोसे कारभार सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिव्हिलमध्ये मृतदेह आदलाबदलीची पहिली घटना दि. 3 मार्च रोजी घडली आहे. माणिकसिंग रजपूत (रा.करंजे, सातारा) यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. याच दरम्यान बेवारस व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यामुळे दोन्ही मृतदेह सिव्हीलच्या शवविच्छेदन विभागात होते. राजपूत यांचे नातेवाईक कर्नाटकमधून येणार असल्याने मृतदेह दि. 4 मार्च रोजी सकाळी मृतदेह घेणार होते. त्यानुसार सिव्हीलमधून सकाळी मृतदेह देण्यात आला.

रजपूत नातेवाईकांनी मृतदेह घरी नेल्यानंतर विधी सुरु करत असताना त्यांच्या लक्षात आले की संबंधित मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा आहे. यामुळे करंजेत गोंधळ उडाला. नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली. तात्काळ याची माहिती सिव्हीलला देण्यात आली. त्यानुसार मृतदेह पुन्हा सिव्हीलमध्ये नेण्यात आला. त्यावेळी तेथे रजपूत यांचा मृतदेह होता. अखेर तो मृतदेह ताब्यात घेवून राजपूत कुटुंबियांनी विधीवत अंत्यसंस्कार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news