पुणे- बंगळूर महामार्गावर कार-ट्रकची धडक; देवदर्शनाला निघालेले दाम्पत्य ठार

पुणे- बंगळूर महामार्गावर कार-ट्रकची धडक; देवदर्शनाला निघालेले दाम्पत्य ठार

नागठाणे : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या एका दाम्पत्यावर बुधवारी काळाने घाला घातला. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे येथील मुख्य चौकात कार आणि ट्रकची धडक झाल्याने दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. धोंडीबा केशव साळुंखे (वय ६७) आणि लक्ष्मी धोंडीबा साळुंखे (वय ६१ रा. ढेबेवाडी, ता. पाटण, सध्या रा. कोपर खैरणे, नवी मुंबई) अशी त्‍यांची नावे आहेत. या अपघातात एकाच चिमुरडीसह चौघेजण जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news