नरेडको संघटनेकडून बीएसएनएलचे अधिकारी धारेवर

अधिकारी, कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार;जनतेला तासनतास तिष्ठत ठेवल्याच्या तक्रारी
Karad News |
कराड : बीएसएनएल कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना जाब विचारताना संतप्त नागरिक.Pudhari Photo
Published on
Updated on

कराड : कराड बीएसएनएल कार्यालयात जाऊन मनमानी कारभार करणारे अधिकारी व कर्मचारी यांना बांधकाम व्यवसायिक संघटना नरेडको कराडचे अध्यक्ष अरविंद खबाले व पदाधिकारी तसेच जागरूक नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले.

बीएसएनएल कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून होत्या. वेळेवर कार्यालयात न येणे, आले तर बाहेर निघून जाणे, जनतेला तासनतास तिष्ठत ठेवणे, अरेरावीची भाषा वापरणे आदी तक्रारी होत्या.

संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरून नागरिकांची माफी मागण्यासाठी भाग पाडले. यावेळी राजे प्रतिष्ठानचे सातारा जिल्हा अध्यक्ष बबलू मुल्ला यांनी अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले. यावेळी कराड आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनअर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश पाटील, नरेडकोचे सचिव संदीप शिंदे, प्रकाश पाटील, रविराज शिंदे, युथ प्रेसिडेंट उदय जाधव, शशिकांत पाटील, किशोर साळुंखे, नितीन मोरे, मिलिंद पाटील, राजेंद्र जाधव, श्रीकांत देसाई, अ‍ॅड.श्रीकांत चावडीमणी, विनायक दळवी, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.

सातारा जिल्हा काँग्रेसच्या अधिकारी गीतांजली थोरात व माजी जि.प.सदस्या विद्याताई थोरवडे यांनीही आपला संताप व्यक्त केला.यावेळी समाजसेवक दादासाहेब शिंगण यांनी अधिकारी माळी यांना सामान्य नागरिकांची माफी मागण्यासाठी भाग पाडले. तसेच कामात सुधारणा करण्यास सांगितले. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news